संस्था माहिती

न्यू इंग्लिश स्कूल, को-हाळे विद्यालयाच्या संस्था माहिती विभागात आपले स्वागत आहे.
======================================
 
संस्था माहिती 
संस्थेचे नाव : रयत शिक्षण संस्था, सातारा
स्थापना : ४ ऑक्टोबर १९१९  
ठिकाण: काले ता.कराड, जि.सातारा
संस्थापक :पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील 
ब्रीदवाक्य : स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद. 
बोधचिन्ह : वटवृक्ष  
======================================



*      संस्था कार्यक्षेत्र नकाशा :






======================================

रयत शिक्षण संस्था
*    प्रत्येक विभागातील शाखावार माहिती


======================================

*    संस्था प्रशासन :
*      अध्यक्ष : मा. नामदार शरदराव गोविंदराव पवार

*    उपाध्यक्ष :
१. मा.सौ.जयश्री अनंतरव चौगुले

२. मा.शिवाजीराव मारुतराव पाटील  

३. मा.एस.एम.पाटील

४. मा.दादाभाऊ दशरथ कळमकर 


   ५. मा.गोपीकिसन गोपीनाथ पाटील


*      चेअरमन :

मा. डॉ.अनिल आप्पासाहेब पाटील

*   

*      सचिव :
मा.प्रि. डॉ.गणेश अनंत ठाकूर

*      सहसचिव (उच्च शिक्षण विभाग):

मा.प्रि. डॉ.दिनानाथ देवराम पाटील

*      सहसचिव (माध्यमिक शिक्षण विभाग):

मा. उत्तम सर्जेराव आवारी

*      ऑडिटर ;

मा.प्रि. शहाजी रंगनाथ डोंगरे
======================================



*      विभागीय सल्लागार मंडळ चेअरमन

मध्य विभाग, सातारा

मा. संजीव जयकुमार पाटील

दक्षिण विभाग, सांगली

मा.माधवराव बाळकृष्ण मोहिते

उत्तर विभाग, अहमदनगर

मा.अरुण पुंजाजी कडू-पाटील

पश्चिम विभाग,पुणे

मा.राम जनार्दन कांडगे

रायगड विभाग

    मा.पी.जे.पाटील  
 =================================================
 विभागीय इन्स्पेक्टर 


मध्य विभाग (सातारा)   :  मा.श्री. एस.एन.जाधव  
दक्षिण विभाग (सांगली)  :  मा.श्री. जे.के.मोरे  
उत्तर विभाग (अहमदनगर):  मा.श्री. बी.वाय. शिरसाठ  
पश्चिम विभाग (पुणे)     : मा.श्री. चंद्रकांत जाधव  
रायगड विभाग (पनवेल)  :  मा.श्री. श्रीशैल टेंगळे


======================================



*    कर्मवीरांचा थोडक्यात परिचय

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात तसेच सामाजिक व सहकार क्षेत्रातदेखील उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्यामुळेच आज लाखो विद्यार्थी शिक्षण घेऊन स्वत:चा तसेच देशाच्या विकास कार्यात हातभार लावत आहेत

पूर्ण नाव: भाऊराव पायगोंडा पाटील

जन्म: २२ सप्टेबर १८८७

जन्म ठिकाण : कुंभोज ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर

निधन : ९ मे १९५९ ( ससून हॉस्पिटल, पुणे )

वडिलांचे पूर्ण नावं : पायगोंडा देवगोंडा पाटील


पत्नीचे नावं : सौ.लक्ष्मीबई भाऊराव पाटील (आदाक्का)


कर्मवीरांची चतुसूत्री : स्वावलंबन-स्वाभिमान-स्वाध्याय-समता

विविध शैक्षणिक प्रयोग :     स्वावलंबी शिक्षण

                        श्रम माहात्म्य

                        कमवा व शिका योजना 

======================================


*    कर्मवीर भाऊराव पाटील शैक्षणिक यांचे कार्य

      कर्मवीर भाऊराव पाटील यांनी १९०९ मध्ये सांगली जिल्ह्यातील दूधगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यात सक्रिय सहभाग घेतला. त्यानंतर ४ ऑक्टोबर १९१९ रोजी कराड तालुक्यातील काले या गावी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. १९२१ मध्ये नेर्ले ता. वाळवा या ठिकाणी वसतिगृह स्थापन करण्यात आले. पुढे १९२४ मध्ये रयत शिक्षण संस्थेचे कार्यालयाचे सातारा या ठिकाणी स्थलांतर करण्यात आले व सर्व जाती धर्मांच्या विद्यार्थ्यांसाठी सातारा येथे मिश्र वसतिगृहाची स्थापना करण्यात आली. आणि याच वसतिगृहाचे २५ फेब्रुवारी १९२७ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या शुभहस्ते थोर समाज सुधारक राजर्षी शाहू महाराज वसतिगृह असे नामकरण करण्यात आले.

      १९३२ साली उच्च शिकक्सन घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी युनियन बोर्डिंग हाऊस ची स्थापना पुणे या ठिकाणी केली. ६ मे १९३५ साली रयत शिक्षण संस्थेचे द सोसायटीज रजिस्ट्रेशन अॅक्ट १८६०  नुसार रजिस्ट्रेशन करण्यात केले. १९३६ साली सातारा येथे मा. रा.ब. काळे यांच्या नावाने पहिली मराठी शाळा सुरू केली. तसेच १९३८ मध्ये यवतेश्वर येथे रयत शिक्षण संस्थेमार्फत चालवली जाणारी पहिली व्हालंटरी  प्राथमिक शाळा सुरू करण्यात आली. पुढे अशाच ५७८ प्राथमिक शाळा डोंगराळ व दुष्काळी भागातील खेडेगावांमध्ये सुरू केल्या. १९४० साली सर्व स्तरातील गरीब विद्यार्थ्यासाठी महाराजा सायजिरव गायकवड यांच्या नावाने मोफत व वसतिगृहयुक्त माध्यमिक शाळा सुरू केली. त्यानंतर अशाच १०१ माध्यमिक शाळा सुरू केल्या. १९४२ साली मुलींच्या शिक्षणासाठी मिश्र वसतिगृह स्थापन केले. आणि प्राथमिक श्री शिक्षिकांसाठी जिजामाता अध्यापिका विद्यालय या नावाने ट्रेनिंग कॉलेज सुरू केले. १९४७ साली छत्रपती शिवाजी महाराज यांचे नावाने उच्च शिक्षण देणारे महाविद्यालय सातारा येथे सुरू केले. संत गाडगे महाराज महाविद्यालय हे कराड तालुक्यात १९५४ साली सुरू केले. तसेच १९५५ साली मौलाना आझाद कॉलेज ऑफ एजुकेशन हे पहिले प्रशिक्षण महाविद्यालय सातारा येथे सुरू केले.

      कर्मवीर भाऊराव पाटील यांचे कार्य हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील शिक्षण संस्थांना प्रेरक व मार्गदर्शक ठरले. त्यांच्या या उल्लेखनीय कार्यासाठी भारत सरकारने २६ जानेवारी १९५९ रोजी पद्मभूषण हा कीब बहाल करून त्यांचा गौरव केला. तसेच कर्मवीर पुणे येथील ससून रुग्णालयात अॅडमिट असताना ५ एप्रिल १९५९ पुणे विद्यापीठाने डी.लिट. पदवी प्रदान करून त्यांचा गौरव केला.    

    जगणे- मरणे हा सृष्टीचा अटळ नियम आहे पण मृत्यूनंतरही लाखो जनमानसांच्या मनांमध्ये जीवंत राहणे म्हणजे खर्‍या अर्थाने जीवन सार्थकी लावणे असते. शिक्षण म्हणजे वाघिणीचे दूध, शिक्षण म्हणजे आयुष्याचं सोने करणारा परीस असे हे शिक्षण तळागाळातील उपेक्षित जनमानसापर्यंत पोहचवणार्‍या या महान शिक्षण महर्षींचे निधन ९ मे १९५९ रोजी ससून हॉस्पिटल, पुणे या ठिकाणी झाला आणि १० मे १९५९ रोजी चार भिंती (गांधी टेकडी) सातारा येथे अग्निसंस्कार करण्यात आले.  असे असले तरीही कर्मवीरांचे विचार आणि त्यांनी घालून दिलेले आदर्श यांच्यानुसार रयत शिक्षण संस्थेची वाटचाल सुरूच आहे.


======================================




   रयत गीत       
रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे
वटवृक्षाच्या विशालतेचा मोह नभाला पडतो आहे !!धृ !!
कर्मवीरांचे ज्ञानपीठ हे शक्तीपीठ ही ठरते आहे
शाहूफुल्यांचे समानतेचे तत्व मानसी मुरते आहे
धर्म जातीच्या पार गांधीचे मूल्य मानवी जपतो आहे...१
रीबांसाठी लेणी मोडून लक्ष्मी वाहिनी ठरली आई
कमवा आणि शिका मंत्र हा तरुणाईला प्रेरक होई
स्वावलंबी वृत्ती ठेवून ज्ञान साधना करतो आहे...२
दीन दलितांसाठी आण्णा तुमची झिजली चंदन काया
अनाथ जीवा सदा लाभली मातृहृदयी तुमची माया
शून्यामधल्या नवसृष्टीचा निर्मिक तोही ठरतो आहे...३
जीवनातला तिमिर जावा प्रबोधनाची पहाट व्हावी
इथे लाभले पंख लेवूनी उंच भरारी नभात घ्यावी
प्रतिभाशाली बहुजनांचा वेलू गगणी चढतो आहे...४ 
                                 कवी – विठ्ठल वाघ



======================================

 रयत माऊली गीत
कर्ण लाजून विचारी माझी माऊली बघून
अरे आभाळाएवढे हिला कुणी दिले मन ? |धृ |
 प्रेम अर्पावे सर्वांना माय फक्त हेच जाणे
दीन अनाथ लेकरा भरविले घास तिने
भुकेजल्या पोरांसाठी विकी सारे सोने नाणे
सौभाग्याचा अलंकार तोही टाकिला विकून
अरे आभाळाएवढे हिला कुणी दिले मन ? ||
कोणकोणाची ही मुले काय होते नाते तिचे ?
लळा लाविला सर्वांना राज्य निर्मी ममतेचे
इवल्याशा लेकरांना दिले पाठ समतेचे
अभिमान आम्हा तिचा जीव टाकू ओवाळून
अरे आभाळाएवढे हिला कुणी दिले मन ? ||
पती रयतेचा वाली सती रयत माऊली
सरस्वतीला भेटाया जणू लक्ष्मी धावली
भेद विसरूनी सारे बने सर्वांची सावली
वावरली जन्मभरी छाया पतीची बनून
अरे आभाळाएवढे हिला कुणी दिले मन? ||
लाखलाख मुले आज माय  वंदिताती तुला
हेवा करावा देवांनी असे भाग्य लाभे तुला
तुझ्या त्यागतुनी माते कर्मवीर जन्मा आला
मूर्त तुझी ठेवू आम्ही हृदयात साठवून
अरे आभाळाएवढे हिला कुणी दिले मन ?  ||
                                                                                                           कवी- प्रा. माधव थोरात  

======================================